जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक शिक्षक नेते ग. चि. ठोंबरे यांचे वृद्धापकाळाने निधन

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक शिक्षक नेते ग. चि. ठोंबरे यांचे वृद्धापकाळाने निधन

सांगली प्रतिनिधी : वाटेगांव (ता . वाळवा ) येथील जेष्ठ स्वातंञ्य सैनिक शिक्षक नेते गणपती चिलू ठोंबरे (वय - ९२ ) यांचे आज पहाटे ४वा . ३० वाजता वाटेगांव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांना प्रशासनाच्या वतिने वाळवा तहसिलदार सचिन पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहीली . तसेच यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र बर्डे ,माजी सरपंच प्रकाश पाटील, पोलीस पाटील संतोष करांडे , युवा उद्योजक संजीव बर्डे तलाटी सौ .दिपाली थोरबोले ,तसेच ग्रामपंचायतीच्या वतिने ग्रामसेवीका शुभांगी भारती , शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंभुराज पाटील , राज्यसंपर्क प्रमुख राजकुमार पाटील विभागीय अध्यक्ष तानाजी खोत संचालक वसंत शिणगारे सह शैक्षणीक, वैद्यकीय ,क्रिडा , सामाजीक राजकीय, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रधांजली वाहीली . कै . ग चि .ठोंबरे यांचा क्रांतीवीर बर्डे गुरुजी यांचे सोबत स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता . तर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व शिक्षक बँकेच्या उभारणीत स्व. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सोबत त्यांचा मोलाचा सहभाग होता त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाचे सदस्य ,राज्य शिक्षक संघाचे सल्लगार , सांगली जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष व जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन आदी पदावर काम केले होते . ते डॉ प्रताप ठोंबरे व शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव - (बारामती ) सचिव प्राचार्य डॉ. धनंजय ठोंबरे यांचे वडील होत . तर, भाजपा जिल्हा वैद्यकीय संयोजक कौस्तुभ ठोंबरे यांचे आजोबा होत .