गोकुळ दुध संघात राजर्षी छञपती शाहू महाराज जयंती साजरी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमीत्य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते व संचालकसो यांच्या उपस्थितीत राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करून उपस्थित सर्वाना राजर्षी शाहू जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, शेतकरी आपली शेती पारंपारिक पद्धतीने करण्याऐवजी आधुनिक तंत्राने शेती करायला हवी असे शाहू महाराजांना वाटायचे. त्यांनी शेतीला आधुनिक संसाधनाची जोड देऊन शेती विकासाला मोलाचे योगदान दिले. यासाठी शेतीविषयक प्रदर्शने आयोजित करून मार्गदर्शन केले. याबरोबर शेतीला पाण्याची अत्यंत गरज आहे, पाणी असेल तरच शेती पिकते म्हणून राधानगरी सारखे धरण उभारून शेतीचा बारमाही पाण्याचा प्रश्न सोडवला. शेतीबरोबरच जोड व्यवसाय करावा याकडे राजर्षी शाहूंनी लक्ष दिले जनावरांची पैदास गाई म्हशींच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सहकारातून विकास होतो हा महाराजांचा दृढ विश्वास होता म्हणून त्यांनी सहकारी संस्था विषयी कायदा केला असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे संचालक अजित नरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले व एम.पी.पाटील यांनी आभार मानले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, सुजित मिणचेकर, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, वित्त व्यवस्थापक हिमांशू कापडिया, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.पी.जे.साळुंखे, डॉ.प्रकाश दळवी, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, बी.आर.पाटील, प्रकाश आडनाईक, बी.एस.मुडकशिवाले, संग्राम मगदूम, लक्ष्मण धनवडे, विनोद वानखडे संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.