जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरु होणार सेमी इंग्रजी माध्यमांचे वर्ग
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या शैक्षणिक वर्षापासून १२० शाळांमध्ये इ. १ ली पासून व २५८ शाळांमध्ये इ. ६ वी पासून सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.
इंग्रजी माध्यमातुन डी.एड. शिक्षक असणाऱ्या शाळांमध्ये इ.१ली पासून व बी.एस.सी.बी.एड. शिक्षक कार्यरत असणाऱ्या शाळांमध्ये इ.६वी पासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करणेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शिक्षण समितीमध्ये सूचना दिली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या १२० शाळांमध्ये इ.१ली पासून व २५८ शाळांमध्ये इ. ६ वी पासून सेमी इंग्रजी वर्ग सुरु करणेकरीता शिक्षण संचालक (प्राथ) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणेत आलेला होता. सदर प्रस्तावास शिक्षण संचालक (प्राथ) पुणे यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार तालुक्यामध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग प्राधान्याने सुरु होणार आहेत.
ज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार ते तालुका निहाय व त्याची संख्या पुढील प्रमाणे आहे. तालुका आजरा इ.१ ली पासून सेमी इंग्रजी (१९ )इ.६ वी पासून सेमी इंग्रजी (१२) चंदगड १४व २७ गडहिंग्लज १६ व ४ हातकणंगले ५ व ४ शिरोळ ५ व ३४ करवीर ५ व १४ पन्हाळा २० व ४२ कागल १० व ४९ शाहूवाडी १० व १७ राधानगरी ६ व २४ भुदरगड ५ व २३ गगनबावडा ५ व ८ इयत्ता पहिलीपासून च्या शाळा एकूण १२० व इयत्ता सहावी पासूनच्या शाळा एकूण २५८ आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.