गोडसाखर' मधील 29 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी शहापूरकरांसह 21 जणांवर गुन्हा दाखल

गोडसाखर' मधील 29 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी शहापूरकरांसह 21 जणांवर गुन्हा दाखल

गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना अर्थात गोडसाखर कारखान्यात 29 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष डॉ .प्रकाश शहापूरकर यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसात कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी गुन्हा दाखल केला आहे. जुना गिअर बॉक्स खरेदी करणे, बॉयलर, बेकायदा डिस्टिलरी विस्तार यामध्ये 11 कोटी 42 लाख 64 हजार रुपयांचा गैरव्यवहार तर आधुनिकीकरण विस्तारीकरण व खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणांमध्ये कारखान्याच्या अध्यक्षांसह तत्कालीन कार्यकारी संचालक, ठेकेदार आणि सचिवांचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.