मणिपूर घटनेच्या निषेधार्थ; युवती सेनेचे मुक आंदोलन

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
मणिपूर येथे महिलांवर झालेल्या हिंसाचाविरोधात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवती सेनेच्यावतीने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.
मणिपूरमध्ये झालेली घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. त्या ठिकाणी महिलांवर झालेल्या हिंसाचाराचा युवती सेनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच युवती सेनेच्या संपर्क युवती अधिकारी अक्षया महाडिक तसेच कोल्हापूर जिल्हा युवती अधिकारी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांच्या हातात लक्षवेधनारी बॅनर होती. या बॅनरवर 56 इंच की छाती, महिलाओं की इज्जत बचाने काम नही आती, द्रोपदी का हर रोज हो रहा है वस्त्रहरण, क्योंकि शासन चला रहा है दुशासन असा मजकूर लिहण्यात आला होता.
यावेळी युवतीसेनेच्या उपजिल्हा युवती अधिकारी श्वेता सुतार, शहर अधिकारी सानिका दामूगडे, सिद्धी दामूगडे, उपशहर प्रिया माने, शहर चिटणीस राजश्री मिणचेकर, शहर समन्वयक काजल दुतांडे तसेच हातकणंगले तालुका अधिकारी ऋतुजा लोहार, शिरोळ तालुका अधिकारी तेजश्विनी राजपूत आदी उपस्थित होत्या.