गोसेवेसाठी विसवर्षाहुन अधिक काळ गोसेवा व गोप्रचार कार्याची नोंद घेवुन गोप्रेमीकडुन फोर व्हीलर गाडी प्रदान*

गोसेवेसाठी विसवर्षाहुन अधिक काळ गोसेवा व गोप्रचार कार्याची नोंद घेवुन गोप्रेमीकडुन फोर व्हीलर गाडी प्रदान*

राधानगरी प्रतिनिधी निवास हुजरे 

अरुण पाटील खेबवडेकर यांनी गेली विसवर्षाहुन अधिक काळ कर्नाटक व महाराष्ट्रभर देशी गोवंशाची महत्व वैज्ञानिक धार्मिक व मानवी व जमीनीच्या सुपीकतेसाठी जनजाग्रुतीचे केलेल्या केलेल्या कार्याची नोंद घेवुन

कर्नाटक महाराष्ट्रातील देशी गोप्रेमी कडून फोर व्हीलर गाडी प्रदान कार्यक्रम पाचगाव येथे राम लक्ष लाॅन असंख्य गोपालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा.भिकाजीराव गाडगीळ व राजु गाडगीळ यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील साहेब,तसेच सतीश खोडवे साहेब,लातूरचे मानव वेदना केंद्राचे कार्य व सुडे गुरुजी, सोलापूर जिल्ह्यातील आदर्श गोपालन लोखंडी गुरुजी, आटपाडीहुन आलेले लोंढे सर, तानाजी मोरे,पैलवान बट्टू जाधव सर,मुरगुड चे नगरसेवक राजू आमते साहेब,चेंडकेसाहेब,कुस्ती निवेदक कृष्णात चौगुले सर, सर्जेराव गमे,कृष्णात गाडगिळ खडकेसर बिनधास्त तानाजी पाटील आदमापुर उपस्थित होते तसेच पाचगाव गावचे गोपालक, राधानगरी,कागल,भुदरगड तालुक्यातील अनेक गोपालकांच्या सानिध्यामध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न झाला