विशाल कुंभार युथ फाऊंडेशन जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न* *पालकांनी विदयार्थ्यामध्ये पाटी- पेन्सीलची आवड निर्माण करावी- भैय्यासाहेब माने
पत्रकार- सुभाष भोसले
मोबाईल मुळे मुले वही व पाटीपासून दुरावत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे पालकांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांमध्ये पाटी पेन्सिलची आवड निर्माण करायला हवी. असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले.
आमदार हसन साहेब मुश्रीफ विशाल कुंभार युथ फाऊंडेशन यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनवाडा ता कागल येथे विशाल कुंभार युथ फाऊंडेशन यांचे वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेत सम्राज्ञी सुतार, मुग्धा सुतार, सानवी गुरुनाथ, अभिमन्यू कुंभार यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावले.
यावेळी भैय्यासाहेब माने पुढे म्हणाले, अशाच पद्धतीचे नवनवीन उपक्रम समाजात राबवण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर ,सांगली, कर्नाटक ,मुंबई येथून 173 स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या मुलांना सुंदर हस्ताक्षर काढण्याची इच्छा झाली त्यासाठी त्यांनी सराव केला सुंदर हस्ताक्षराच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे अशा पद्धतीच्या पालकांच्या आलेल्या प्रतिक्रिया हेच स्पर्धेचे यश म्हणावे लागेल असे मत विशाल कुंभार यांनी व्यक्त केले. स्पर्धेत मोठ्या गटात सम्राज्ञी सुतार, अविष्कार अनुसे , क्रांती पाटील , शिवानंद बेनाडे , दोन नंबर गटात मुग्धा सुतार ,अर्णवी मुधाळे, प्रणवी मुधाळे, तन्मय पाटील, तीन नंबर गटात सानवी गुरुनाथ, देवकी काटकर, प्राजक्ता कदम, चार नंबर गटात अभिमन्यू कुंभार, सार्थक पाटील, समरजीत लोकरे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. यावेळी चंद्रकांत गवळी, नवल बोते, नितीन दिंडे,विशाल कुंभार ,अजितकुमार पाटील , प्रसाद ठाणेकर , प्रकाश कुंभार उपस्थित होते.