घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीचे जेईई मेन्समध्ये उत्तुंग यश

अतिग्रे : उज्वल यशाची परंपरा कायम राखणाऱ्या संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकॅडमी ने जेईई मेन्स मध्ये यशाची गरुडझेप घेतली आहे. संस्थेच्या सार्थक खोत याने (९९. ९७) पर्सेन्टाइल गुण प्राप्त केले आहेत, तसेच शेठ हेत सचिन (९९. ९५) पर्सेन्टाइल, हर्ष गांधी (९९. ९२) पर्सन्टाइल, आर्यन पुजारी (९९. ८९) पर्सेन्टाइल गुण मिळवले आहेत. संस्थेच्या ३७ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेन्टाइल वरती गुण प्राप्त केले. सार्थक खोत, हर्ष गांधी, आर्यन पुजारी या विद्यार्थ्यांनी फिजिक्स या विषयामध्ये १०० पर्सेन्टाइल गुण मिळवले.
सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकॅडमीचे डायरेक्टर वासू यांनी अभिनंदन केले व ते म्हणाले , “संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकॅडमी नेहमी असेच यशस्वी विद्यार्थी घडवेल व SGIMA चे नाव संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये पहिल्या क्रमांकावर राहील असा आमचा प्रयत्न असेल”. सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे, चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले.