HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी शेंडा पार्क येथील 35 हेक्टर जमीन हस्तांतरित करावी; कोल्हापूर चित्रनगरीसाठी 71 कोटींचा निधी द्यावा - आमदार अमल महाडिक यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी

कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी शेंडा पार्क येथील 35 हेक्टर जमीन हस्तांतरित करावी; कोल्हापूर चित्रनगरीसाठी 71 कोटींचा निधी द्यावा - आमदार अमल महाडिक यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापुरातील आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आमदार अमल महाडिक यांची भेट घेत  अडचणी मांडल्या होत्या. शेंडा पार्क येथे आयटी पार्क गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. कृषी विभागाकडे असलेली 35.71 हेक्टर जमीन एमआयडीसी कडे तातडीने हस्तांतरित होण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार महाडिक यांच्याकडे केली होती. आमदार अमल महाडिक यांनीही हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने मुंबई येथे आमदार महाडिक यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अशी शेलार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कोल्हापुरातील आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून आजमितीला 350 हून अधिक लहान मोठ्या कंपन्या कोल्हापूर मध्ये कार्यरत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात या कंपन्यांनी तब्बल 189 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तसेच कोल्हापुरातील हजारो तरुण पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद अशा विविध शहरांमध्ये आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. कोल्हापुरात आयटी पार्क झाल्यास कोल्हापुरातील तरुणांचे भविष्यातील स्थलांतर थांबणार आहे तसेच आयटी कंपन्यांना विस्ताराला वाव मिळून मोठी आर्थिक प्रगती साधता येणार आहे.

ही बाब ध्यानात घेऊन आयटी पार्क साठी मंजूर जमिनीचे हस्तांतरण लवकरात लवकर करावे अशी मागणी आमदार महाडिक यांनी शेलार यांच्याकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधित विभागाचे मंत्री,सचिव, अधिकारी आणि कोल्हापूर आयटी असोसिएशनचे पराधिकारी यांच्या समवेत व्यापक बैठक घेऊन त्वरित निर्णय घेतला जाईल असा विश्वास मंत्री शेलार यांनी दिला.

कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा हा निर्णय ठरेल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर चित्र पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये चित्रनगरीची कामे प्रगतीपथावर आहेत. ज्या चित्रनगरीच्या विस्तारीकरण सुशोभीकरणासाठी 71 कोटी रुपयांची मागणी आमदार अमल महाडिक यांनी मंत्री शेलार यांच्याकडे केली. 

या निधीतून चित्रनगरी परिसरातील मंदिराशेजारी असलेल्या जलाशयाला घाट बांधणे, जल कुंभावर गजीबो उभारणे आणि जल कुंभाला इपॉक्सी पेंट करणे, चित्रनगरीच्या टप्पा3 मध्ये चित्रीकरणासाठी कॅफेटेरिया उभारणे, चित्रनगरीतील रेल्वे स्थानकावर शौचालय उभारणे, चित्रनगरीचे मुख्य प्रवेशद्वार उभारणे, राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चित्रनगरीच्या भूखंडावर पेव्हींग ब्लॉक बसवणे, चित्र नगरीमध्ये सोलर सिस्टिम बसवणे, चित्रीकरण साहित्य ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यासाठी गोडाऊन उभारणे, चित्रीकरणासाठी अद्ययावत आणि सुसज्ज असा भव्य स्टुडिओ उभारणे, चित्रनगरीतील अंतर्गत रस्ते,नवीन उद्याने विकसित करणे, चित्रीकरणासाठी चार नवीन लोकेशन्स बनवणे, सुसज्ज ऑडिटोरियम, कॉन्फरन्स हॉल, एक्जीबिशन हॉल, क्लासरूमसह अधिकारी कर्मचारी वसाहत बांधणे, संपूर्ण चित्रनगरीमध्ये सीसीटीव्ही बसवणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. 

कोल्हापुरातील चित्रनगरीचे रूप पालटल्यास विविध चित्रपट मालिका यांचे चित्रीकरण करणे सुलभ जाईल. त्यामुळे कोल्हापुरातील तंत्रज्ञ, कलाकार आणि एकूणच चित्रपट व्यवसायास उर्जितावस्था मिळून चित्र पंढरी ही कोल्हापूरची ओळख अधिक ठळक होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली. 

एकंदरीतच कोल्हापूरच्या चित्रनगरी आणि आयटी पार्क या जिव्हाळ्याच्या विषयांना गती देण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी सक्रिय पुढाकार घेतला  असल्याचे दिसत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.