हौसेला मोल नाही! सागर विलास पाटील त्याच्या पत्नी गीता सागर पाटील यांनी थाटामाटात साजरा केला गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम.*
राधानगरी प्रतिनिधी: निवास हुजरे
ग्रामीण संस्कृतीत गाईला मोठं महत्त्व आहे. हाच श्रद्धा आणि आदरभाव जपत एका शेतकर्यांने गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला. यावेळी गो अभ्यासक अरुण पाटील (खेबवडेकर), यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
म्हणतात ना हौसेला मोल नाही, आर्थिक परिस्थिती कितीही बेताची असो. श्रद्धा आणि हौस जिथं आली तिथं त्याला मोल नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ली या छोट्याश्या गावातील सागर पाटील या शेतकऱ्यांने गाईचे नाव लावण्या ठेवलं.
या पार्वतीचा लेकीप्रमाणे पाटील कुटुंबाने पालनपोषण करत असताना ती गाभण गेली आणि तीच डोहाळे जेवण करावा असा विचार असताना लेकीसमान असलेल्या गाईच्या डोहाळे जेवण कार्यक्रम करावं असं निर्णय घरात झाला. यासाठी पैहि पाहुणे गावकरी मित्र मंडळी यांना निमंत्रण दिले. डोहाळे जेवण कार्यक्रमात ज्या काही विधी आहेत त्या सर्व करण्यात आल्या. या कार्यक्रमाला गो अभ्यासक अरुण पाटील (खेबवडेकर), खोडवे फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड चे चेअरमन सतीश खोडवे, महाराष्ट्र राज्य पंचगव्य असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. नितेश ओझा आणि इतर प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात रूढी परंपरा लोप पावल्या जात असल्याची ओरड होत असताना, एका सामान्य शेतकऱ्याने गाईचे डोहाळे जेवण कार्यक्रम केले याची आता जोरदार चर्चा होत आहे