घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि आयटीआय अभ्यासक्रम 'प्रारंभ २०२४' या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि आयटीआय अभ्यासक्रम 'प्रारंभ २०२४' या कार्यक्रमाचे उद्घाटन  संपन्न

हाचकणंगले (प्रतिनिधी) : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी आणि आय टी आय "प्रारंभ-२०२४" या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या वेळी इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट व्ही. गिरी, बेसिक सायन्स विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. प्रशांत पाटील, आयटीआय प्राचार्य, प्रा. स्वप्निल ठीकने सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. विनीत जाखलेकर , प्रा. पूजा पाटील हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत पाटील यांनी केले. इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक आणि आयटीआयच्या सर्व विभागाचे प्रवेश 100% झालेले स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश निश्चित केल्याबद्दल सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत केले. तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचे नियोजन, वेळोवेळी पालकांचे सहकार्य, सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पालक आणि शिक्षक यामधील असणाऱ्या वेगवेगळ्या संवाद भेटी, अकॅडमी वार्षिक नियोजन याविषयी रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली.

डायरेक्टर, डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या करियर मध्ये सक्सेस मिळवून देण्याचे सर्वस्व जबाबदारी आम्ही स्वीकारतो अशी ग्वाही देऊन या शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा नाम उल्लेख करून ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांचे विशिष्ट गुण स्पष्ट करून करिअर निवडलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा दिली. चेअरमन संजय घोडावत यांचे विद्यार्थ्यांच्या हिताचे व्हिजन बेस्ट ऑफ बेस्ट आणि नवीन शैक्षणिक पॉलिसी विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विश्वस्त, विनायक भोसले यांच्या हस्ते प्रवेश घेतलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इन्स्टिट्यूट मधील प्राध्यापकांना सन्मानित करण्यात आले. विनायक भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले "संजय घोडावत इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ख्यातनाम संस्था आहेच येथे ज्ञानार्जन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जीवन मूल्य आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्यांत येत आहे." शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात वेळ न घालवता स्वतःचा नवीन उद्योग धंद्याला सुरुवात करून तो उद्योग ब्रँड बनवण्याचे तंत्र आणि ‘थ्री सी’ विद्यार्थ्यांना समजून सांगितले पालकांना गुंतवणूक करायची असेल तर आपल्या मुलाच्या शिक्षणावर करा असा कानमंत्र ही त्यांनी दिला. ज्या विद्यार्थ्याकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असतील त्या इन्स्टिट्यूट मध्ये सादर करा. निवड झालेल्या संकल्पनेला “एक लाखाची” बक्षीस त्यांनी या वेळी जाहीर केले.

उपस्थित पालकांनी आणि विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. विनीत जाखलेकर यांनी केले. 

 संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, संजय घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले यांनी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांना त्यांच्या करिअर साठी शुभेच्छा दिल्या.