शरद इन्स्टिट्युट अविष्कार संशोधन स्पर्धेत उत्कृष्ट

शरद इन्स्टिट्युट अविष्कार संशोधन स्पर्धेत उत्कृष्ट

यड्राव प्रतिनिधी : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘अविष्कार’ या संशोधन प्रकल्प स्पर्धेत व्दितीय व तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेत शरदच्या दोन प्रकल्पांना हा पुरस्कार मिळाला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे येथे राज्य स्तरावरील स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये या दोन प्रकल्पांचे सादरीकरण झाले. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २६ विद्यापीठातील शेकडो महाविद्यालय व संघ सहभागी झाले होते. यामध्ये इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी विभागात महाविद्यालयाला यश मिळाले. 

यामध्ये इलेकट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील सुयश पांडे, ऋतुराज पाटिल, मोहक सिदगोड़ा, महेश अवल्क्की यांनी ‘गतिशीलता-माइंड्स: पाल्सी, अॅमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस, कॉडा इक्विना रूग्णांसाठी एआय सशक्त स्टँडरसह संभाव्यता सोडवणे’ हा संशोधन प्रकल्प डॉ. सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला व्दितीय क्रमांक मिळाला. 

तसेच मेकॅनिकल विभागातील अथर्व जोशी, वैभव चौगुले, रोहन ठोमके, हर्षवर्धन कामत, हर्षवर्धन जाधव या विद्यार्थ्यांनी ‘मानवी पायाच्या खालच्या आणि वरच्या गुडघ्यांसाठी सक्रिय प्रोस्थेटिक घोटा’ हा संशोधन प्रकल्प प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला तृतीय क्रमांक मिळाला.

विद्यार्थ्याच्या लपलेल्या नाविण्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा ओळखून त्यांना संशोधनक्षमता विकसित करण्यासाठी संधी प्रदान करणे. तसेच संशोधनाचा दर्जा वाढविण्यासाठी संशोधकांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण करणे या उदिष्टांसह विद्यार्थ्यामध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राचे तात्कालिक माननीय राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांचे कुलपती यांनी २००६-०७ या शैक्षणिक वर्षापासून आविष्कार-महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन अधिवेशन सुरु केले आहे.

अविष्कारचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सचिन गुरव, प्रा. धनश्री बिरादार यांच्यासह महाविद्यालयातील डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यी, प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.