HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

१५ वर्षे सत्तेत असूनही कॉंग्रेसने जनतेला कोणत्याही मुलभूत सुविधा दिल्या नाहीत - खा. धनंजय महाडिक

१५ वर्षे सत्तेत असूनही कॉंग्रेसने जनतेला कोणत्याही मुलभूत सुविधा दिल्या नाहीत - खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गेली १५ वर्षे कोल्हापूर महापालिका कॉंग्रेसच्या ताब्यात होती. मात्र त्यांनी जनतेला कोणत्याही मुलभूत सुविधा पुरवल्या नाहीत, असा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला. आज प्रभाग क्रमांक ८१ मधील जीवबा नाना जाधव पार्क येथे आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आणि १५ लाखांच्या निधीतून, ख्रिश्चन समाजासाठीच्या सभागृहाचे भुमीपूजन करताना ते बोलत होते. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यात ते अंघोळ करून आले. पण अजूनही कोल्हापूरला पाणी मिळत नाही, हे दुर्देव आहे, असा टोलाही महाडिक यांनी लगावला. जनतेने आम्हाला महापालिकेत साथ दिल्यास शहरासह उपनगरांचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ८१ मधील जीवबा नाना जाधव पार्क इथल्या करवीर साक्षी गणेश मंदिरसमोर ख्रिश्‍चन समाजाच्या सभागृहासाठी १५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या सभागृहाचे भुमीपूजन रविवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून देशाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचा विकास पूर्णत्वाला येत आहे. कोल्हापूर महापालिका ही गेली १५ वर्षे कॉंग्रेसच्या ताब्यात होती. मात्र त्यांनी नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत, असा टोला यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला.

थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यात ते अंघोळ करून आले. मात्र अजूनही कोल्हापूरला पाणी मिळत नाही, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरसाठी पंतप्रधान मोदी यांनी २७० कोटींचा निधी दिला आहे. त्यातून रस्ते, वीज, तसेच विविध उद्योग उभारणी होत आहे. कोल्हापुरातील विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने जिल्ह्यातील उद्योगांत वाढ होणार आहे. जनतेने महापालिकेसाठी आम्हाला साथ दिल्यास शहरासह उपनगरांचा कायापालट करून सर्वांगीण विकास करू, अशी ग्वाही यावेळी खासदार महाडिक यांनी दिली.

यावेळी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ राजू जाधव, प्राध्यापक महादेव पोकळे, ऍड. दिपक गोते, दिलीप पाटील, गोपालकृष्ण काशीद यांनी मनोगतं व्यक्त केली. यावेळी रामचंद्र कुंभार, विनय खोपडे, योगेश ओटावकर, वैभव कुंभार सचिन जाधव, नितीन पाटील, अमोल टिपुगडे, राहुल सावंत, सचिन कलिकते, सतीश पाटील, निलेश पाटील, अभिजीत लोहार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.