HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितल्यानंतरही शिर्के कुटुंबीयांचा वाद कायम

'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितल्यानंतरही शिर्के कुटुंबीयांचा वाद कायम

मुंबई: छावा चित्रपटात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना खलनायक म्हणून दाखवल्यानं छावा चित्रपटातून शिर्के घराण्याची बदनामी झाल्याचा आरोप शिर्के घराण्याचे वंशज दीपक शिर्के यांनी केलाय. याबाबत आता शिर्के घराणे आक्रमक झाल्याच पाहायला मिळतय. 

शिर्के घराण्याचे वंशज असलेल्या दीपक शिर्के यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर या वादाला तोडं फुटलं आहे. चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याने लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी शिर्केंच्या वंशजांनी केली होती. त्यानंतर उतेकर माफी मागत वादावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला. पण आता छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणे आक्रमक झाल्याचं समजतंय.

दरम्यान, छावा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीच उतरला असला तरी यात दाखण्यात आलेल्या काही गोष्टींवर आता आक्षेप घेतला जातोय. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी वतनाच्या हट्टापायी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी मुघलांना मदत केल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळं शिर्के घराण्याची बदनामी होत असल्याचं आता त्यांच्या वंशजांनी म्हटलंय. आक्रमक झालेल्या वंशजांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई लढणार 

आज २४ फेब्रुवारी रोजी पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात शिरकाई देवी मंदिरात सर्व शिर्के कुटुंबीय एकत्र येणार असल्याची माहिती आहे. छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधातील रस्त्यावरील आणि न्यायालीयन लढाई आजपासून सुरु करणार असल्याची माहिती शिर्के घराण्यातील सदस्यांनी दिली आहे.

१०० कोटींचा दावा ठोकणार

शिर्केंनी छत्रपतींशी गद्दारी केली याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना, राजे शिर्के घराण्याला दोषी ठरवण्यात येत आहे. त्यामुळं सिनेमाच्या दिग्दर्शकांवर १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी दिले स्पष्टीकरण ?

लक्ष्मण उतेकर यांना कोणताही वाद वाढवायचा नाहीये, त्यामुळं त्यांनी तत्काळ माफी मागितली. पण आता तरी देखील शिर्केंचे वंशज आक्रमक झाले आहेत. हा चित्रपट लेख शिवाजी सावंत यांच्या गाजलेल्या छावा कांदबरीवर आधारित आहे. कांदबरीत गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, यांच्याबद्दल, तसंच त्यांच्या कुलदैवताबद्दल माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी आलेल्या मालिकांमध्येही नावाचा उल्लेख करण्यात आलाय. पण आमच्या सिनेमात आम्ही शिर्के आडनावाचा उल्लेखही केला नाही. गणोजी आणि कान्होजी असाच उल्लेख आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.