'या' प्रख्यात गायिकेची तब्येत बिघडली ; रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रख्यात कोलंबियन गायिका-गीतकार शकीरा हिची तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे शकीराला पेरूमधील तिचा कॉन्सर्ट रद्द करावा लागला. शकीराने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
रविवारी, शकीराने तिच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, ती रुग्णालयात दाखल आहे आणि तिला पोटाच्या समस्या आहेत. शकीराने असंही सांगितलं की, तिच्या डॉक्टरांनी तिला परफाॅर्म करण्यास मनाई केली आहे. 'तुम्हा सर्वांना कळवताना मला दुःख होत आहे की, काल रात्री पोटाच्या समस्येमुळे मला ईआरमध्ये जावे लागलं आणि मी सध्या रुग्णालयात दाखल आहे.'असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सोमवारपर्यंत डिस्चार्ज मिळेल
रुग्णालयात असूनही, हिप्स डोन्ट लाई गायिकेला लवकरच रंगमंचावर परतण्याचा विश्वास आहे. सोमवारपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची आणि पुन्हा दौरा सुरू होण्याची आशा शकिराने व्यक्त केली. तिने असंही सांगितलं की, तिची टीम आणि कॉन्सर्ट प्रमोटर्स आधीच नवीन तारखेवर काम करत आहेत. 'मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते आणि तुमच्या समजुतीची प्रशंसा करते' असं ती पुढे म्हणाली.
डॉक्टरांकडून शकीराला परफाॅर्म न करण्याचा सल्ला
डॉक्टरांनी शकीराला परफॉर्मन्स न करण्याचा सल्ला दिलं आहे. शकीरा स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी योग्य स्थितीत नाही. शकीराने शो रद्द झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. ती पेरूमधील तिच्या चाहत्यांसाठी परफाॅर्म करण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे. तिने लिहिलं, 'मला खूप दुःख आहे की ,मी आज स्टेजवर जाऊ शकणार नाही. पेरूमध्ये माझ्या चाहत्यांना भेटण्यासाठी मी खूप उत्साहित होते.'