जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्ती केल्याप्रकरणी एकास अटक
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्ती केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील नणुद्रें येथील एकास अटक करण्यात आली आहे. भूषण शंकर जाधव (वय 23) असे आरोपीचे नाव आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीत आरोपीने सुमारे तीन वर्षे कोल्हापुरातील लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्ती केले व नग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचे म्हटले आहे. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने हा सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर आरोपी भूषण जाधव याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला पन्हाळा न्यायालयात हजर केला असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, किशोर पाटील, विनायक पाटील, सलीम सनदी हे करत आहेत.