डॉ. सूरज पवार यांना घारपुरे पुरस्कार

डॉ. सूरज पवार यांना घारपुरे पुरस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सूरज पवार यांचा वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. के. सी. घारपुरे यांच्या नावे दिला जाणारा राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला. मॅसिकॉनतर्फे आयोजित परिषदेच्या शेवटच्या दिवशी डॉ. पवार यांच्या २६ वर्षांच्या योगदानाबद्दल मॅसिकॉनचे सचिव डॉ. आनंद कामत व महाराष्ट्र सर्जिकल सोसायटीचे सचिव डॉ. सचिन नाईक यांच्या हस्ते गौरवले.

डॉ. पवार म्हणाले, 'परदेशात करिअरची मोठी संधी असतानाही आपण समाजाप्रती काही देणे लागतो या भावनेने कोल्हापूर येथे कॅन्सर सेंटर सुरू करून रुग्णांवर उपचार केले. यापुढेही रुग्णांबरोबरच उपेक्षित, दुर्लक्षित, अनाथ घटकांसाठी काम करायचे. कॅन्सर सेंटरमधून आजपर्यंत ५० हजारांवर रुग्णांवर उपचार केले. त्यातील ४० हजार रुग्णांवर मोफत उपचार केले. समाजातील उपेक्षित बालके, कचरावेधक महिला अशा दुर्लक्षित घटकांसाठी काम करताना खारीचा वाटा उचलला. पत्नी डॉ. रेश्मा पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.