महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पहिला मेळावा संपन्न

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पहिला मेळावा संपन्न

      महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांचा आज पहिला मेळावा रामभाई समाणी हॉल, उद्यम नगर येथे घेण्यात आला. पत्रकारांशी हितगुज, संघटनेची दिशा, ध्येयधोरणे, पदनियुक्ती, पत्रकारांच्या समस्येंबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे दीपप्रज्वलन जेष्ठ क्राइम रिपोर्टर नंदकुमार उतारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शिवाजी विद्यापीठ मास कम्युनिकेशन विभागाचे डॉ. शिवाजी जाधव, युवा पत्रकार संघांचे शिवाजी शिंगे, जिल्हाध्यक्ष धीरज रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात आजची पत्रकारिता काय असावी या विषयावर उपस्थित मान्यवरांनी विचार स्पष्ट केले.

         जेष्ठ क्राईम रिपोर्टर नंदकुमार उतारी यांनी 'पत्रकारिता आणि आजची व्यवस्था' या विषयावर बोलताना पत्रकारांनी क्राईम रिपोर्टींग करत असताना प्रत्येक कलमांची माहिती व त्याबाबतचा अभ्यास असणे गरजेचे आहे. एखादी घटना मांडत असताना ती समाजभान ठेवून मांडावी असे त्यांनी सांगितले.

           मास कम्युनिकेशन विभागाचे डॉ. शिवाजी जाधव यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थिती बाबत बोलताना पत्रकार अनुभवी नसतो अनुभव निर्माण करायचा असतो तसेच पत्रकारिता करताना त्यामध्ये 'मी' नसावा, समाजाला काय हवं आहे ही भूमिका प्रत्येक पत्रकारांनी ठेवावी असे सांगितले .

       यावेळी प्रिंट मीडिया, डिजिटल मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.