गडहिंग्लज पालिकेच्या ८७ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

गडहिंग्लज पालिकेच्या ८७ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

कोल्हापूर - गडहिंग्लज येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ८७ कर्मचाऱ्यांची तपासणी केली. भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त राजे फाउंडेशन व राजे बँक यांच्यामार्फत हे शिबिर झाले. 

यावेळी राजे बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्र घोरपडे म्हणाले, दैनंदिन कामाच्या धावपळीत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन याचा फटका त्यांच्यासह कुटुंबीयांना बसतो. त्यामुळे अशा घटकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीतून अभिवादन केले आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही असे आणखी सामाजिक उपक्रम राबवू.

महागाव येथील संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटलच्या डॉ. रोहिणी पाटील,डॉ. मृण्मयी डाळ, विशाल आडनुरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत तपासणी केली. यामध्ये हृदयरोग,डोळे,रक्तदाब, रक्तातील साखर व जनरल चेकअप केले. वैद्यकीय सल्ला व औषधेही वाटप केली.

यावेळी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, सारिका खोत, अनिल गंधमवाड, धनंजय चव्हाण, नंदकुमार पाटील, सुनील गुरव, जयंती समितीचे अध्यक्ष दिगंबर विटेकरी, रामदास कुराडे, भीमा कोमारे, अभिनंदन पाटील, सतीश हळदकर, अभिषेक पाटील, अझर बोजगार, बाजीराव खोत, अमोल बिलावर, गणेश हजारे, आदी उपस्थित होते.