जिल्हयातील सर्व गावामध्ये स्वच्छ माझे अंगण अभियान राबविणार- कार्तिकेयन. एस.

जिल्हयातील सर्व गावामध्ये स्वच्छ माझे अंगण अभियान राबविणार- कार्तिकेयन. एस.

कोल्हापूर (प्रतिनिधि) : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा- २ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावे मार्च 2025 पर्यंत हागणदारी मुक्त अधिक मॉडेल घोषित करणेसाठी गावांमध्ये लोकसहभागाच्या माध्यमातुन लोकचळवळ निर्माण व्हावी या उदृदेशाने दिनांक 01.09.2024 ते दिनांक 25.09.2024 या कालावधीत स्वच्छ माझे अंगण हे अभियान राज्य शासनाकडुन राबविणेत येत आहे. या अभियानाची जिल्हयातील सर्व गावांमध्ये कुटुंब स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस., जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा- २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन (कुटुंबस्तर), सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तर) राबवित असलेल्या गावातील सर्व कुटुंबस्तरावर सदर बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नित्य नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगिकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनकरिता शोषखड्डा/परसबाग/पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली असून त्यांचा नियमितपणे वापर करतात अशा कुटुंबाना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे अनुकरण करण्याकरिता इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्या प्रमाणेच वैयक्तिक स्वरुपांच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी स्वच्छ माझे अंगण हे अभियान राबविणेत येत आहे. 

सदर अभियानाची अंमलबजावणी करताना खालील बाबींवर भर देणेत आला आहे. 

• वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता, शाश्वत स्वरुपात सर्व कुटुंब सदस्यांकडून वापर आणि ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यात कुटुंबांचा पुढाकार. 

• कुटुंबस्तरावर दैनंदिन घनकचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका कचरा, ओला कचरा कुंडयामध्ये वर्गीकरण करणे. 

• वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा निर्मिती करुन कचऱ्याचे, घर किंवा घराच्या परिसरातच व्यवस्थापन करणे.