जिल्हा परिषद कोल्हापूर सन 2024-25 अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धा

जिल्हा परिषद कोल्हापूर सन 2024-25 अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धा

कोल्हापूर प्रतिनिधी  : कोल्हापूर परिषद कोल्हापूर कडील दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. दिनांक 05 फेब्रुवारी, 2025 रोजी वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे बुध्दीबळ स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचे उदघाटन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या शुभ हस्ते झाले. यास्पर्धेमध्ये नियमीत महिला, पुरुष कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या बुध्दीबळ स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये नियमित कर्मचारी यांचे 18 ते 35, 36 ते 45 व 46 ते 60 असे तीन वयोगट नुसार स्पर्धा घेण्यात आल्या व कंत्राटी कर्मचारी यांचा खुला गट खेळविणेत आला. 

          त्यामध्ये पुरुष 18 ते 35 या वयोगटामध्ये असिफ सययद प्रथम, वैभद गुटटे ‍ व्दितीय व चिंतामणी कारजगे तृतीय क्रमांक यांनी पटकविला. 36 ते 45 या वयोगटामध्ये सचिन माने प्रथम, विनायक सुतार व्दितीय व मुरलीधर कुंभार तृतीय क्रमांक यांनी पटकविला. 46 ते 60 या वयोगटमध्ये सुभाष भोसले प्रथम, प्रशांत गायकवाड व्दितीय व सुनिल व्हटकर यांनी तृतीय क्रमांक पटकविला, 

महिला गटामध्ये 18 ते 35 वयोगट समिक्षा पाटील प्रथम, तेजस्विनी टिपुगडे व्दितीय, दिक्षा ओहळा तृतीय क्रमांक यांनी पटकविला. वयोगट 36 ते 45 मध्ये सुप्रिया घोरपडे प्रथम, राजश्री काकतकर व्दितीय व मनिषा कांबळे तृतीय क्रमांक यांनी पटकविला. वयोगट 46 ते 60 मध्ये मनिषा देसाई प्रथम, शुभांगी कार्वेकर व्दितीय व अर्चना खाडे तृतीय क्रमांक पटकविला.

त्यानंतर कंत्राटी पुरुष मध्ये राहूल जावडे प्रथम, शरद जाधव व्दितीय तर गजानन कुलकर्णी तृतीय क्रमांक यांनी पटकविला. कंत्राटी महिला कर्मचारी मध्ये सायली पाटील प्रथम, संमृध्दी पाटील व्दितीय, कविता माळी तृतीय क्रमांक यांनी पटकविला. कर्मचारी बरोबर अधिकारी यांनीही या खेळाचा आनंद घेतला.

  आतंरराष्ट्रीय पंच भरत चौगुले व राष्ट्रीय पंच मनिष मारुलकर व आरती मोदी यांनी काम पाहिले व बुध्दीबळ स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन प्रसाद बोरकर, प्रज्योत कुंभार, सुशांत सुर्यवंशी , स्वप्नील पाटील, अदित्य पोवार व सागर जाधव यांनी केले .

 यानंतर 10 फेब्रुवारी रोजी सायकल व दिनांक 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी अखेर व्हॉली बॉल पुरुष स्पर्धा होणार आहेत.