HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सक्षम पतसंस्थेच्या तिस-या शाखेचे घोसरवाडमध्ये उद्घाटन

सक्षम पतसंस्थेच्या तिस-या शाखेचे घोसरवाडमध्ये उद्घाटन

जयसिंगपूर - घोसरवाड येथे सक्षम नागरी सहकारी पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन प्राज इंडस्ट्रीचे अध्यक्ष व मुख्य टेक्नॉलॉजीचे ऑफिसर प्रमोद कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष अनिल बागणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुंभार म्हणाले, पाकदर्शक व्यवहार व कार्य ह्या दोन्ही गोष्टीमुळेच अल्पावधीत सक्षम पतसंस्थेने तालुक्यातील नागरीकांच्या विश्वास संपादन केले आहे. त्यामुळे तिसरी शाखा निघत आहे. ठेवीदार व कर्जदार या दोन्ही घटकांमध्ये योग्य समन्वय ठेवून संस्था कार्यरत आहे. एनपीएही शुन्य टक्के असून परिसरातील समाजाच्या उन्नतीत सक्षम पतसंस्था हि मोठी भागीदार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी संस्था व संस्थाचालकांच्यावर लोकांचा विश्वास वाढतच जातो. म्हणूनच संस्था व पर्यायाने त्याचे सभासद व ग्राहक यांची आर्थिक उन्नती होत राहते. यावेळी नागरीकांकडून ठेवीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. 

यावेळी सुरेश बारवाडे, अभय बारवाडे, सुनील अकिवाटे, माजी सरपंच मयूर खोत, रावसाहेब पाटील, अॅड. मोहन जाधव, माजी सरपंच विद्याधर बारवाडे, सेवा सोसायटी संचालक अमोल आलासे, मॅनेजर राजगोंडा पाटील सर्व कर्मचारी वर्ग तसेच घोसरवाड, टाकळीवाडी, हेरवाड दत्तवाड परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.