कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागेची तयारी-अनिल घाटगे

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागेची तयारी-अनिल घाटगे

कोल्हापूर प्रतिनिधि: महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे जिल्ह्यातील लोकसभेनंतर पक्ष आदेशानुसार जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तयारी सुरुवात केली असून, दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची तयारी पूर्ण झाली असून वेळप्रसंगी दहाच्या दहा जागा लढवणे विषयी तयारी करण्यात आली आहे.

दहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची यादी खालील प्रमाणे आहे.

विधानसभा इच्छुकांची यादी

कोल्हापूर उत्तर:- व्ही बी पाटील, आर के पोवार , पद्मजा तीवले, अनिल घाटगे

कोल्हापूर दक्षिण :- व्ही बी पाटील, सुनील देसाई, अश्विनी माने मांगुरकर,  

करवीर :- व्ही बी पाटील शिंगणापूर, श्रीकांत पाटील पाडळी खुर्द, पंडित कळके वाकरे, प्रकाश पाटील गगनबावडा

राधानगरी भुदरगड:- मुकुंद देसाई-आजरा, संतोष मेंगाने-भुदरगड, पक्षात प्रवेश केल्यास ए वाय पाटील व के पी पाटील  

चंदगड:- अमर चव्हाण, रामराजे कुपेकर, नंदादेवी बाभुळकर, शिवप्रसाद तेली 

कागल:- शिवानंद माळी, स्वाती कोरी 

हातकणंगले :- माजी आमदार राजू किसनराव आवळे 

शिरोळ:- विक्रमसिंह जगदाळे, रावसाहेब भिलवडे, डी. पी. कदम सर, सौ स्नेहा वसंतराव देसाई हेरवाडकर सरकार

इचलकरंजी:- मदन कारंडे प्रदेश सरचिटणीस

शाहूवाडी पन्हाळा:- ॲड.राजेंद्र उर्फ आबासाहेब पाटील, संदीप मोहिते, अधिकराव जाधव

या व्यतिरिक्त इतर पक्षातील काही प्रमुख लोकांनी देखील संपर्क साधला असून त्या नावाचा सुद्धा विचार होऊ शकतो सदरची यादी ही शरदचंद्र पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सादर केली असून आपापल्या मतदारसंघांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जो देतील तो आदेश आणि बांधतील ते तोरण याप्रमाणे काम करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी सर्वांनी ताकतीने प्रयत्न करावे असे आवाहन व्ही बी पाटील यांनी केले असून प्रदेश कार्यालयाकडून या जुलै महिन्याच्या शेवटी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय प्रशिक्षण शिबिर प्रदेश कार्यालयाकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी दोन टीम मार्गदर्शक प्रदेश कडून येणार आहे निवडणूक तयारी, विजयी होण्यासाठी घ्यावयाची दक्षता यासाठी प्रत्येक मतदारसंघात जाऊन तीन तासाचे प्रशिक्षण कार्यक्रम घेणार आहेत सदरची टीम ही दोन दिवसत दहा मतदारसंघांमध्ये जाऊन आपले शिबिर घेणार आहे याचीही तयारी पूर्ण झाली झाली असल्याची माहिती अनिल घाटगे यांनी दिली.