आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक महासंघ कोल्हापूर जिल्हा दिव्यांग अध्यक्षपदी सदाशिव कांबळे

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक महासंघ कोल्हापूर जिल्हा दिव्यांग अध्यक्षपदी सदाशिव कांबळे
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने पिरळ तालुका राधानगरी येथील सदाशिव बापू कांबळे यांची कोल्हापूर जिल्हा दिव्यांग अध्यक्षपदी व कोल्हापूर जिल्हा दिव्यांग उपाध्यक्षपदी अंकुश वाघमारे आणि राधानगरी तालुका अध्यक्षपदी रघुनाथ कांबळे (चांदेकर )यांची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक महासंघ ही देशभर मानवाधिकार लोक कल्याणकारी सामाजिक कार्य आणि लोककल्याण समाज हितार्थ कार्यकर्तृत्वासाठी व विधायक कार्यासाठी नेहमी अग्रेसर असते सदाशिव बापू कांबळे यांचे आजपर्यंतचे सामाजिक कार्य कर्तुत्व लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय मानव न्यायिक महासंघाने दखल घेऊन त्यांची कोल्हापूर जिल्हा दिव्यांग अध्यक्षपदी निवडीचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय डायरेक्टर विजयराव गुजैर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या निवडी वेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रणजीत कांबळे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी कांबळे सिकंदर बनगे ,दादा लांडगे, दिनेश लांडगे, विनय निले, प्रदीप सोनवणे, शोभा कापडे, आदिती उजगावकर, पन्हाळा तालुका संपर्कप्रमुख भिवा बनसोडे, बाळासाहेब नरंदॆकर, रवी रसाळ आदी उपस्थित होते.