HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जुनी पेन्शन योजना :१४ मार्चला राज्यव्यापी संपाला शिक्षण संस्थांचा जाहीर पाठिंबा रावसाहेब पाटील

जुनी पेन्शन योजना :१४ मार्चला राज्यव्यापी संपाला शिक्षण संस्थांचा जाहीर पाठिंबा रावसाहेब पाटील

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

सांगली दि.६:सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन योजना ही शासकीय कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा जगण्याचा एकमेव आधार आहे. पाच राज्यांत पुन्हा ही योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेही ती लागू केली पाहिजे यासाठी १४ मार्चला राज्यव्यापी संप पुकारला आहे त्यामध्ये शासकीय व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. सर्व संघटनांनी वज्रमूठ बांधली आहे. या संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा पाठिंबा आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी असा महामंडळाने अधिवेशनात ठराव संमत केला आहे व तो शासनाला सादर केला आहे. सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचाही या संपाला पाठिंबा आहे.

दि. १४ मार्चच्या संपात सहभागी होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खासगी शिक्षण संस्थांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले आहे. संप नियोजनासाठी आयोजित विविध संघटना पदाधिकाऱ्यांच्या सांगली हायस्कूलमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे होते.

यावेळी प्रा. एन.डी.बिरनाळे, महावीर सौंदत्ते, संजय झांबरे, रघुनाथ सातपुते, मकरंद कुलकर्णी, सौ. मिरजकर, प्रमोद काकडे, बापू दाभाडे, राजेंद्र नागरगोजे, बाळासाहेब कटारे, नितीन जाधव, अरविंद जैनापुरे, अमोल शिंदे, बाबासाहेब लाड, पी. एन. काळे, संजय पवार यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शंभर टक्के संपात सहभागी व्हावे. जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. 

यावेळी एम. एन. राजमाने, एम. जी. कुलकर्णी, एम. एस. कोळी, एम. एस. मजलेकर, आर. ए. हेरले, सचिन पाटील, प्रवीण मगदूम, अनंत पाटील, अशोक मासाळ, सतिश दास, रतन कुंभार, अरिफ गोलंदाज, सुरेश व दिपक संकपाळ, सुरेश कदम, सचिन केंगार, गणेश ऐवळे, गणेश कबीर, सुरेश कटरे, एल. के. मकानदार, के. नदाफ, बजरंग शिंदे, उत्तम सुपने, सागर खाडे, मिलन नागणे, रवी अर्जुने इ. उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.