जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेचा नगरपंचायत राळेगाव समोर दि.8 मार्च ला ठीया आंदोलन

जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेचा नगरपंचायत राळेगाव  समोर दि.8 मार्च ला ठीया आंदोलन

संजय कारवटकर राळेगाव तालुका प्रतिनीधी

 मुख्याधिकरी नगर पंचायत राळेगाव यांनी राळेगाव शहरामध्ये गवंडी बांधकाम कामगार व इतर कामगार यांना महारष्ट्र शासन २०१७ च्या निर्णयाप्रमाणे  २१ प्रकारच्या कामगाराला ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का देण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामसेवक व शहरी भागातील मुख्याधिकारी यांना शासनाने नियुक्ती केल्याप्रमाणे गेल्या एका वर्षा पासून राळेगाव नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांच्या कडून गवंडी बांधकाम कामगार व इतर क्षेत्रामध्ये २१ प्रकारच्या कामगारांना  सही व शिक्का देत नासल्यामूळे जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांच्या वतीने  मुख्याधिकारी साहेब नगर पंचायत राळेगाव यांना वारंवार निवेदन दिले असून सुद्धा कोणताही निर्णय घेवून कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे नालाजने  दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मा तहसीलदार साहेब राळेगाव यांच्या मार्फत नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते व गवंडी बांधकाम कामगार व इतर सर्व कामगार यांना आठ दिवसाच्या आत 90 दिवासच्या प्रमानपत्रवर सही व शिक्का देण्यात यावा या करीता जनवादी बांधकाम कामगार संघटना यवतमाळ व राळेगाव येथील वंचित गवंडी बांधकाम कामगार व इतर  कामगाराणी ठीया आंदोलन करण्याच्या इशाराचे निवेदन देऊन सुद्धा अद्याप पावतो नगर पंचायत कडून कामगारांच्या ,९०दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का देण्याचा कोणतीही निर्णय घेण्यातला नसल्यामुळे दिनांक ८ मार्च २०२३ रोजी जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली व राळेगाव येथील वंचित गवंडी बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्या उपस्थीती मध्ये  नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये राळेगाव येथील कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ठीया आंदोलन सुरू ठेवण्यात येईल या ठीया आंदोलनामध्ये कामगारांकडून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास शासनाने व प्रशासनाने स्वता सर्वस्वी जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी असे आव्हान संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी केले आहे