HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

पत्रकारांना टोल माफी करण्यासाठी प्रयत्न करू त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडू -- कामगार मंत्री नामदार श्री सुरेश (भाऊ ) खाडे

पत्रकारांना  टोल माफी  करण्यासाठी प्रयत्न करू त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडू -- कामगार मंत्री नामदार श्री  सुरेश (भाऊ ) खाडे

पत्रकार- सुभाष भोसले

सांगली येथील विश्रामबाग येथे झालेल्या केंद्रीय पत्रकार संघाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवणाऱ्या क्या न्यूज चॅनलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना नामदार सुरेश खाडे म्हणाले की, क्या न्यूज हा पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवणारा मैलाचा दगड बनणार आहे.देश पातळीवरील या चॅनलचे ॲप सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये घ्यावे. या माध्यमातून सर्वसामान्यांना व सर्वांनाच आपल्या भागातील बातम्या पाहता व वाचता येतील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी केले या कार्यक्रमासाठी केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप कसाळकर क्या न्यूजचे संस्थापक देवेश गुप्ता, जेष्ठ पत्रकार धनंजय पाठक,पोलीस निरीक्षक श्री पवार, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते आनंदा पाटील, मनसेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव , श्री चंद्रशेखर क्षीरसागर, अमोल जाधव महेश भिसे नयना पाशी,रवींद्र लोंढे, संजय पवार,सदानंद माळी समाजसेवक घेवदे,अजित कुलकर्णी ऋषी माने,आनंदा पाटील,पंकज गाडे प्रदीप थोरात, गौरव शेटे व इतर पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते.यानंतर बोलताना जेष्ठ पत्रकार धनंजय पाठक म्हणाले की केंद्रीय पत्रकार संघटना निश्चितपणे पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवेल त्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल . क्या न्यूज हा भारतातील पहिला असा चॅनेल आहे जो पत्रकारांना सन्मानाने व आर्थिक सक्षमतेने जगायला सक्षम बनवत आहे यानंतर बोलताना क्या न्यूज चे संस्थापक श्री देवेश गुप्ता यांनी क्या न्यूज ची माहिती सांगितली व ते कसे पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवणारे हे देखील सांगितले.सामान्य जनतेला क्या न्यूजच्या माध्यमातून आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी एक सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर मनसेचे उपाध्यक्ष श्री जाधव यांनी पत्रकारांच्यामुळे आम्ही जगापुढे येतो पण पत्रकारांच्या पाठीशी आपण सक्षमपणे राहिले पाहिजे. पत्रकारांच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजेत.आम्ही निश्चितपणे पत्रकारांच्या मागण्या आणि त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते मोहन पाटील यांनी शेतकरी वर्गाला निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार नेहमीच सोबत असतात असे सांगितले.विविध मान्यवरांची मनोगते व सत्कार यावेळी करण्यात आला. यानंतर बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसाळकर यांनी केंद्रीय पत्रकार संघटना विविध मागण्याद्वारे पत्रकारांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.पत्रकारांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून टोल माफ करणे, जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारांना मोफत जागा मिळवून देणे,पत्रकारांवरती होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात पत्रकार संरक्षण हक्क कायद्यांतर्गत त्यांना न्याय मिळवून देणे अशा विविध मागण्या केल्याचे सांगितले.यावेळी श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी कामगार मंत्री श्री सुरेश खाडे भाऊ यांना या कार्यक्रमात थांबण्याची प्रेमळ विनवणी केली आणि ती स्वीकारत मोठ्या व्यापात असणारे कामगार मंत्री महोदय यांनी या कार्यक्रमात थांबून आनंद घेतला.यानंतर मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. केंद्रीय पत्रकार संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. श्री रवींद्र लोंढे हे जिल्हाध्यक्ष तर सचिव पदी श्री महेश भिसे यांची निवड जाहीर करण्यात आली. आभार श्री सदानंद माळी यांनी मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.