महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जबाबदारी घेवू - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे जुनी पेन्शन संघटनेला सांगली भेटीत आश्वासन*

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जबाबदारी घेवू - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे जुनी पेन्शन संघटनेला सांगली भेटीत आश्वासन*

मिरज:- संजय पवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले सांगली दौऱ्यावर आले असता राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत काँग्रेस पक्षाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेवून राज्याचा विधानभवनात नानाभाऊ पटोले व त्यांच्या सहकारी आमदार महोदयांनी आवाज उठवला त्याबद्दल जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे व सहकाऱ्यांनी भेट घेवून त्यांचे आभार मानले.यावेळी काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील उपस्थित होते.

राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनेच्या मागणीच्या अनुषंगाने एक समिती नेमली असून सर्व विरोधी पक्षाने या समितीकडे राजस्थान,हिमाचल व अन्य पाच राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मागणी करावी.तसेच येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात देण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, लिपीकवर्गिय संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर बाबर,पाटबंधारे विभाग संघटनेचे अमेय जंगम,जुनी पेन्शन संघटना मिरज तालुका अध्यक्ष रमेश मगदूम यांनी दिले.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनीही जुनी पेन्शन लागू व्हावी ही सर्व कर्मचाऱ्यांची मागणी असून सांगली मोर्चा व संपानंतर मृत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला परंतु नियत सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती यावेळी केली.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून ज्या ज्या राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आली आहे तेथे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली असून महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जबाबदारी माझी असल्याचे यावेळी नानाभाऊ पटोले यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,लिपिक वर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर बाबर,पाटबंधारे विभाग कर्मचारी संघटनेचे अमेय जंगम,संगीता मोरे, जुनी पेन्शन संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष रमेश मगदूम,नर्सेस संघटनेचे विवेक कुरणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.