सर्वोदय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर सुरू
सर्वोदय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी योग प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर सुरू
मिरज:- संजय पवार
सर्वोदय विद्यालयामध्ये बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा म्हणून योग मार्गदर्शन व शिबिर सुरू झाले. सुरुवातीस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी सुचेता म्हेतर मॅडम यांनी जागतिक कीर्तीचे योग अभ्यासक डॉक्टर हेमंत पाटील व आरोग्यसेविका प्रियंका पाटील यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी योग अभ्यासक डॉक्टर हेमंत पाटील यांनी हसत खेळत विद्यार्थ्यांना योगांचे महत्त्व सांगून अनेक योग आसनांचे तंत्र शुद्ध प्रशिक्षण दिले. सदरचे योग शिबिर विद्यालयाने सुरू केल्याबद्दल पालकांनी धन्यवाद व्यक्त केला. डॉक्टर हेमंत पाटील यांचा परिचय व सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रणधीर सर यांनी केले. सदर शिबिराचे नियोजन व आयोजन विद्यालयातील क्रीडा शिक्षक संजय पवार व सचिन बाड सर यांनी केले.या शिबिरासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सदरचे योग शिबिर शनिवार पर्यंत चार दिवस चालणार आहे.