ज्वेलरी एक्सपोर्ट सेमिनार उत्साहात संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी : सोने चांदी दागिन्यांच्या एक्सपोर्ट ला प्रचंड मागणी आहे, यासाठीच सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्य, आर.आर.बी फाउंडेशन , ऑल इंडिया ज्वेलर्स ऍंड गोल्डस्मिथ फाउंडेशन यांचे मार्फत ज्वेलरी एक्सपोर्ट कसे करावी याची माहिती देण्यासाठी जेम्स एंड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल(GJEPC) यांचेमार्फत ज्वेलरी एक्सपोर्ट सेमिनार चे कोल्हापुरात आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला.
या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एक्सपोर्ट मार्गदर्शक मिहीर शहा,GJEPC चे राष्ट्रीय डायरेक्टर मिथिलेश पांडे, संपूर्ण भारतात सर्वात मोठी ज्वेलरी एक्झिबीशन करणारी संस्था IIJS च्या डायरेक्टर नाहिद सुंके, पोस्ट अधिकारी धमांगे व GJEPC कोऑर्डीनेटर अर्चना पांडे उपस्थित होत्या.
कोल्हापूर ची पारंपरिक ज्वेलरी भारतातच नाही तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोल्हापुरातील मॅन्युफॅक्चर, ज्वेलर्स व कारागीरांना एक्सपोर्ट मधे प्रचंड मोठी संधी असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एक्सपोर्ट मार्गदर्शक मिहिर शहा यांनी केले. भारताने युएई व इतर देशांशी ज्वेलरी एक्सपोर्ट साठी करार केले आहेत. एक्सपोर्ट ज्वेलरीला शुन्य टक्के GST लागतो तसेच लेबर चार्ज सुद्धा जास्त मिळतो व डाॅलर मधे इन्कम होते, त्यामुळे स्थानिक पातळीवर दागिन्यांच्या विक्री पेक्षा जर ज्वेलरी एक्सपोर्ट केली तर अधिक फायदा मिळुन शकतो असे शहा यांनी सांगितले.
भारतामध्ये GJEPC व इंडियन पोस्ट यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार संपूर्ण भारतातच नाही तर विदेशात सुद्धा पोस्टामार्फत दागिने पाठवले जाऊ शकतात, असे इंडियन पोस्ट अधिकारी दमांगे यांनी सांगितले. यामध्ये अधिक सुरक्षितपणे दागिन्यांची डीलीव्हरी होऊ शकते व दागिन्यांचा इन्शुरन्स ही कव्हर होतो असेही दमांगे यांनी नमूद केले.
कोल्हापुरात ज्वेलरी क्लस्टर होण्यासाठी सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष नचिकेत भुर्के यांनी प्रयत्न करावेत व त्यासाठी आम्ही आपणास संपूर्ण सहकार्य करु असे आश्वासन पांडे यांनी दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नचिकेत भुर्के, उपाध्यक्ष प्रकाश घाटगे, सेक्रेटरी गोपीनाथ नार्वेकर, खजानिस विजय औंधकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय म्हसवेकर, सहसचिव सचिन ढणाल, संचालक सागर नलवडे, प्रशांत अतिग्रे यांनी केले.
या सेमिनारला कोल्हापूर, बेळगाव, सातारा, सांगली, मिरज येथील ज्वेलर्स, ज्वेलरी मॅन्युफॅक्चर व कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.