शेणे गावच्या विकासासाठी भरपूर निधी आणू- खासदार धैर्यशील माने

शेणे गावच्या विकासासाठी भरपूर निधी आणू- खासदार धैर्यशील माने

इस्लांमपूर (प्रतिनिधी) : शेणे गावच्या विकासासाठी केंद्र व राज्याकडून भरघोष स्वरूपात निधी मंजूर करून आनू व सर्वांगिण विकास करणेसाठी प्रयत्नशिल राहू असे आश्वासन खासदार धैर्यशिल माने यांनी दिले .

शेणे (ता वाळवा )येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपुजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार माने बोलत होते . अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेंचे संचालक व भाजप नेते सत्यजित देशमुख होते .

यावेळी रयत क्रांतीचे राज्य अध्यक्ष सागर खोत , धनाजी निकम ,जोतिराम पाटील ,रामभाऊ पाटील . , राजाराम पाटील आदी प्रमुख उपस्थित होते . प्रारंभी स्वागत प्रास्ताविक माजी सरपंच विनायक निकम यांनी केले . यावेळी खासदार धैर्यशील माने, बँकेचे संचालक सत्यजित देशमुख व राज्य अध्यक्ष सागर खोत यांचे हस्ते रामोशी समाज मंदिराचा लोकापर्ण सोहळा तसेच . सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून भवानी मंदिर तिर्थक्षेत्र पर्यटन विकास माध्यमातून गावातून मंदिरा कडे जाणाऱ्या रस्त्याचे क्रॉक्रीटीकरण चे भूमिपूजन . तसेच खासदार धैर्यशिल माने यांचे प्रयत्नातून जिल्हा नियोजन मधुन भवानी मंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला .आभार डॉ . गणेश पाटील यांनी मानले . संयोजन जालींदर पाटील , यांनी केले .

या कार्यक्रमास ज्योतिलिंग दुध संस्थेचे अध्यक्ष सुजित पाटील ग्रामपंचायत सदस्य वैभव शेटके पै तुषार निकम ओमकार पाटील कॉ ट्रॅक्टर सिद्धार्थ पाटील संकेत पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते . .