डी. एम. फाउंडेशनचे काम कौतुकास्पद

डी. एम. फाउंडेशनचे काम कौतुकास्पद

कोल्हापूर प्रतिनिधी :- मुबारक अत्तार 

डी.एम. फाउंडेशन हे गेले दोन ते तीन वर्ष गरजू गरीब फिरस्ते बांधवांना एक हात मदतीचा या संकल्पनेतून काम करीत आहेत.

फुटपाथ वर आयुष्य काढणारे फिरस्ते बांधव यांना कोणी वाली नसतो जे मिळेल त्यातच ते आपले पूर्ण आयुष्य काढत असतात याचीच खंत डी.एम. फाउंडेशनचे अध्यक्ष दानिश अस्लम मनेर यांना वाटू लागली यांनी 2020 मध्ये फाउंडेशन ची स्थापना करून दर आठवड्यातून एकदा फूटपाट वरील फिरस्ते बांधव, मंदिरा शेजारील बसणारे गरीब बांधव यांना आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात थंडीच्या दिवसात ब्लॅंकेट, स्वेटर देने, अन्नदान फूड पॅकेट, पिझ्झा, बर्गर, वडापाव, बिर्याणी असे वेगवेगळे पदार्थ बनवून त्या बांधवांना खाऊ घालने फिरस्ते बांधवांना खाऊ घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे जे हास्य असते ते बघून मी समाधानकारक असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष दानिश मनेर यांनी यावेळी सांगितले.

दानिश अस्लम मनेर युवा असून त्यांनी या फाउंडेशच्या माध्यमातून केलेले काम खरोखरच युवा पिढीला प्रेरणा देणारे असून त्याच्यासोबत नोमान मकानदार, जैद मनेर, आयान आंबेकरी, आवेश मनेर, अल्तमस शेख हे सर्व युवा मुले त्यांच्यासोबत फाउंडेशनचे काम करीत आहेत.