HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाईन क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये निवड झाली आहे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे ही निवड झाली आहे.

 

अंतिम वर्षाच्या बी.आर्क. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये  पुणे, कोल्हापूर, मुंबई, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद येथील आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाईन क्षेत्रातील एकूण २५ नामवंत कंपन्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये हाफिज कॉन्ट्रॅक्टर अँड असोसिएट्स, मुंबई, मेनहर्टझ बंगलोर, अनुपम डे असोसिएट्स मुंबई, द बॉक्स डिझाईन पुणे, डिझाईन वैन गोवा, ट्राय डिझाईन असोसिएट्स पुणे, आर्चलँड कोल्हापूर अशा नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा मिश्र स्वरूपात विद्यार्थ्यांशी संवाद साधून ४२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.

या यशस्वी मेगा प्लेसमेंट ड्राइव्हचे समन्वयन प्रा. पूजा जिरगे, प्रा. संतोष आळवेकर आणि प्रा. तन्वी शेटके यांनी केले. अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार व ट्रेनिंग व प्लेसमेंट मकरंद काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश  मालदे,  स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे विभागप्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.