शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी ..!

कोल्हापूर - क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. स्मिता पाटील यांचे " भारतातील उच्च शिक्षण व त्यापुढील आव्हाने" या विषयावर व्याख्यान झाले. यावर बोलताना त्यांनी बदलती सामाजिक परिस्थिती, जागतिकीकरण व बहुभाषिकतेचे महत्व यावर आपले विचार व्यक्त केले. त्याबरोबर स्त्रीवाद व लिंग समानता यासंबंधित संशोधन पत्रिकेवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले. महात्मा फुले यांचे विचार नवीन पिढीकडे संक्रमित करण्याची आवश्यकता विषद केली. प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन डॉ.विद्यानंद खंडागळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी अविष्कार व भिंत्तीपत्रके या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता घोटल यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीकांत संकपाळ यांनी केले.
यावेळी अधिविभागातील डॉ. रूपाली संकपाळ, डॉ. सुप्रिया पाटील, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, डॉ. विनया कांबळे , तसेच अधिविभागातील संशोधक संगीता चंदनवाले, संगीता माने, संजना भालकर, संजय चव्हाण, बी.एड.एम एड (एकात्मिक) एम एड् व बी. एससी. बी. एड (एकात्मिक) अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.