डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करणाऱ्या व त्यांना नेहमीच विरोध करणाऱ्या काँग्रेसला गाढून टाका - संजय पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध पैलूची प्रंचड विविधता असणाऱ्या भारत देशाला एकसंघ ठेवणारी घटना लिहिणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासह नेहमीच विरोध करणाऱ्या काँग्रेसला कायमस्वरूपी गाढून टाका असे आग्रही प्रतिपादन बेळगाव कर्नाटक चे आमदार - भाजपा नेते संजय पाटील यांनी केले.
संभाजीनगर मधील सुधाकर जोशी नगर येथे झालेल्या निर्धार प्रचार सभेत ते बोलत होते . भाषा, खानपान, भौगोलिक विभिन्न वातावरण अशी प्रचंड विविधता असणाऱ्या भारता ची आज जगातील एक आघाडीचा देश गणना झाली आहे. या झालेल्या प्रचंड प्रगतीच्या योगदानामध्ये घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान आहे. यांच्या विचाराला न्याय देण्यासाठी महायुती नक्कीच कटिबद्ध आहे. त्यासाठीच कोल्हापूर दक्षिण मधून गेली सातत्याने दहा वर्षे कार्यरत, सर्वाच्या सहज संपर्कात असलेले अमल महाडिक यांना बहुमताने विजयी करावे असे आहवान त्यांनी यावेळी बोलताना केले . आरपीआयचे ज्येष्ठ नेते ॲड.वाल्मिकी निकाळजे यांनी सुधाकर जोशी नगरातील रहिवाशांना गेली अनेक वर्ष रखडलेला मालकी हक्काचे सातबारा उतारे मिळण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी महायुती ला साथ द्या असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.
भाजपाचे महानगरपालिका गटनेते अजित ठाणेकर यावेळी बोलताना म्हणाले आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि आपल्या सहकार्याने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात विराजमान होणार आहे, त्यासाठी दमदार साथ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या कमळ चिन्ह समोरचे बटन दाबून त्यांना आपल्या आणि परिसराच्या प्रगतीसाठी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
युवा नेते कृष्णराज महाडिक यावेळी बोलताना म्हणाले बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिला आणि आणि असंख्य लाभार्थ्यांची संख्या पाहता *वारं बदलले आहे* आणि *ऋतू बदलणार* हे आता स्पष्ट झाल्याचेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेतून या परिसरात पक्की घरे होण्यासाठी आपण आग्रहाने प्रयत्नशील राहू त्यासाठी स्थानिक राज्यात आणि केंद्रात एका विचाराचे सरकार असणे गरजेचे आहे, त्यासाठीच अमल महाडिक यांना विजयी करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले माजी नगरसेवक विजय खाडे पाटील यांनी आपल्या भाषणात या सभेस उपस्थित प्रचंड संख्या पाहता महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्चित आहे मात्र त्यासाठी सर्वांनी अधिकाधिक टक्केवारी ने कमळास मतदान होईल असे पाहणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. या सभेला या सभेला सुधाकर जोशी नगर मध्ये हातावर पोट असणाऱ्या सर्व मतदार बंधू - भगिनींचे तसेच भागातील सर्व तरुण मंडळे त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच सभेस रात्री उशीर होऊनी महिलांची असलेली लक्षणीय उपस्थिती हा परिसरात चर्चेचा विषय बनला होता.
या सभेप्रसंगी सुधाकर जोशी नगर मधील प्रभाकर गायकवाड, प्रदीप म्हस्के, शिवाजी शेटे, उमेश कांबळे, बापू माने, सतीश गाडीवडर, गोटू गाडीवडर, अक्षय बिद्रे, दयानंद नागटीले यांच्यासोबत युवा ग्रुप, एकी तरुण मंडळ, चिंतामणी तरुण मंडळ, जय भीम तरुण मंडळ या मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते