थेरगाव येथे राजर्षी शाहू साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

थेरगाव येथे राजर्षी शाहू साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सरुड (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार व शाहूवाडी तालुक्यातील भूमिपुत्र साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. रविवार थेरगाव येथील सत्संग भवन येथे हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर तर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती. या सोहळ्यात वनिता जांगळे, प्राचार्य डॉ. जे. के. पवार, डॉ. शांताराम डफळ, कै. शिवाजी पाटील, महादेव माने, निलेश महिगावकर, छाया कोरेगावकर, अभिजित हेगशेट्ये यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व साहित्य रसिकांची उपस्थित मोठ्या प्रमाणात होतो.