के.एस.ए. व कोल्हापूरची पहिली महिला प्रशिक्षक सिद्दी रविंद्र शेळके

के.एस.ए. व कोल्हापूरची पहिली महिला प्रशिक्षक सिद्दी रविंद्र शेळके

कोल्हापूर प्रतिनिधी: स्पोर्टस् ऑथेरिटी ऑफ इंडिया च्यावतीने दि. डिसेंबर, २०२४ ते जानेवारी, २०२५ या कालावधीत नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोर्टस् | NIS] फुटबॉल कोच परिक्षा पतियाला हा सहा आठवड्यांचा सर्टिफिकेट कोर्स साई, एनएस इस्टर्न सेंटर, कोलकत्ता येथे घेणेत आली. या परिक्षेसाठी महाराष्ट्र, राजस्थान, लक्षद्विप, मणीपूर, पंजाब, सिक्कीम, नागालँड, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तामीळनाडू या राज्यातील परिक्षार्थी होते. महाराष्ट्र राज्यातील सिद्दी रविंद्र शेळके ही नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोर्टस् [ NIS -Six Week ] फुटबॉल कोच शारिरीक क्षमता व लेखी चाचणी यां परिक्षेमध्ये पास झालेली असून फुटबॉल प्रशिक्षणमध्ये हा कोर्स पूर्ण करणारी ती कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली महिला प्रशिक्षक आहे.

सिद्दी ही छत्रपती शाहू विद्यालय व कॉमर्स कॉलेजची विद्यार्थीनी आहे. आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेतील जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावरील सुब्रोतो यां स्पर्धांमध्ये छत्रपती शाहू विद्यालय फुटबॉल संघातून सिद्दीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलेले आहे. कोल्हापूरातील महिला संघातूनही ती खेळत आहे. महिला फुटबॉल पंच म्हणून रायगड, चिपळूण, जळगांव, पालघर व पूणे येथील महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तमरितीने पंच म्हणून कामकाज केलेले आहे. व आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणाऱ्या फुटबॉल स्पर्धांसाठी पंच म्हणून कार्यरत आहे. सिद्दी ही कॉमर्स कॉलेजमध्ये एम. कॉम. प्रथम वर्षात शिकत आहे.

सिद्दी शेळके यांना संस्थेचे पेट्रन्-इन्-चीफ छत्रपती शाहू महाराज व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे व्हा. प्रेसिडेंट, के.एस.ए.चे प्रेसिडेंट मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे महिला समिती सदस्या मधुरिमाराजे छत्रपती, ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, जॉ. जनरल सेक्रेटरी अमर सासने, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव, सेक्रेटरी प्रदीप साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने एन.आय.एस. फुटबॉल प्रशिक्षक सिद्दी शेळके यांचे अभिनंदन करण्यात आले.