दिल्ली येथे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

दिल्ली येथे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

मुंबई वृत्तसंस्था: महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समिती आणि स्क्रिनिंग समितीची एकत्रित बैठक राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी आणि राष्ट्रीय संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये मधुसुधन मिस्त्री, रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील उपस्थित होते. 

यावेळी निवडणुक समितीच्या सदस्या अंबिका सोनी, अधिररंजन चौधरी, सलमान खुर्शिद, अमी याजनिक, श्रीवेला प्रसाद, बी. पी. सिंग, सप्तगीरी उलाका, मन्सूर अली खान यांच्यासह इतर सदस्य़ उपस्थित होते.