दुःखद..!सस्तंगात चेंगराचेंगरी;122 भाविकांचा मृत्यू

दुःखद..!सस्तंगात चेंगराचेंगरी;122 भाविकांचा मृत्यू

लखनऊउत्तर प्रदेशातील हत्रस लगतच्या फुलराई या गावातील एका सस्तंगात चेंगराचेंगरी होऊन  122 भाविकांचा मृत्यू झाला मंगळवारी ही दुर्घटना घडली दीडशेवर लोक जखमी आहेत. भोले  बाबा उर्फ नारायण साकार हरी यांच्या सस्तंगाला भाविकांची अलोट गर्दी झाली ती अनियंत्रित झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञातांसह आयोजकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, आयोजकांनी ८० हजार लोकांच्या मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या कार्यक्रमात तब्बल अडीच लाखांहून अधिक लोक जमले होते. तसंच, त्यांच्यावर पुरावे बदलण्यात आल्याचेही आरोप आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

 

कोण भोले बाबा..?

भोले बाबा यूपीतीलच काशीरामनगर जिल्ह्यातील पटयाली तालुक्यातील बहादूरनगरी गावचे मूळ रहिवासी आहेत. 26 वर्षांपूर्वी त्यांनी सरकारी नोकरी सोडून, नारायण साकारहरी हे नाव धारण केले, आणि सस्तंग सुरू केला. नंतर  त्यांना भोले बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तराखंड मध्ये त्यांचे अनुयायी आहेत.