"बिद्री" वरील कारवाईचा कामगारांकडून निषेध

"बिद्री" वरील कारवाईचा कामगारांकडून निषेध

बिद्रि प्रतिनिधी : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी निलंबित केला.राज्य सरकारने केलेल्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ आज (दि.२५) बिद्री कारखाना प्रवेशद्वारासमोर कामगारांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. कामगारांनी वेळ आलीच तर उपोषणास बसण्याची तयारी असल्याचे सांगितले. याप्रसंगी कामगारांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, कामगारांनी आज दिवसभर निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले.