HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

दूध उत्पादक शेतकऱ्याला गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य - आ. सतेज पाटील

दूध उत्पादक शेतकऱ्याला गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य - आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) - दूध उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. अजिंक्यतारा कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

करवीर तालुक्यातील शिये येथील श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक व कृषी पूरक संस्थेची निवडणूक 25 मे रोजी संपन्न झाली. संस्थेच्या या निवडणुकीत राजा शिवछत्रपती स्थानिक आघाडीचे सर्व 15 संचालक विजयी झाले. या सर्व संचालकांनी आज अजिंक्यतारा कार्यालय येथे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी नूतन संचालकांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

आ. सतेज पाटील पुढे म्हणाले, गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीवेळी दूध उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये जादा दर देण्याचा शब्द दिला होता. मात्र, प्रत्यक्षात दूध उत्पादकांना बारा रुपयांची दरवाढ दिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केले जातं आहे. गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळावा यासाठी महादेव दूध संस्थेच्या नूतन संचालकांनी प्रयत्न करावा असंही आ. सतेज पाटील म्हणाले. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक नावाजलेल्या सहकारी संस्था आहेत, त्यापैकी महादेव दूध सहकारी संस्था असून या संस्थेत झालेलं परिवर्तन पाहता, नूतन संचालक मंडळांनी सभासदाभिमुख कारभार करावा असं आवाहन केलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी, गावात स्थानिक विकास आघाडी, माध्यमातून ही निवडणूक लढवली. आमदार सतेज पाटील यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्यामुळे सत्ता परिवर्तन करू शकल्याचं त्यांनी सांगितलं. हनमंत पाटील यांनी, या दूध संस्थेचा 2 हजार संकलनाचा टप्पा पार करु असा विश्वास व्यक्त केला. 

यावेळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, हणमंत पाटील, विकास चौगले, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग पाटील, दत्तात्रय शिंदे,एम. डी. पाटील, यांच्यासह महादेव दूध संस्थेचे सर्व नूतन संचालक उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.