HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पुढील 15 दिवसांत तालुकास्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात. आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचना, राजकिय पात्रता असे विषय सर्व पक्षांनी अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटीत काम करावे असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. आज अजिंक्यतारा येथे घेतलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत मार्गदर्शन त्यांनी मार्गदर्शन केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या बैठका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आढावा घेण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आ. जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, पी. एन. पाटील, व्ही. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात पार पडली.

यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, निवडणुका या लोकशाही एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ह्या इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन लढवूया. कोणतेही हेवे दावे न ठेवता,भांडण तंटा न करता एकमेकांमध्ये समन्वय ठेवून लढवूया आणि जिंकूया. यासाठी सर्वांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे असे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पुढील 15 दिवसांत तालुकास्तरावरील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत. आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचना, राजकिय पात्रता असे विषय सर्व पक्षांनी अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटीत काम करावे असं आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. 

यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, बाबासो देवकर, भारती पोवार, सुभाष जाधव, अनिल लव्हेकर अशा विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, वसंत पाटील, उदय नारकर, बाळासाहेब सरनाईक, अनिल घाटगे, डी.जी. भास्कर, व्यंकाप्पा भोसले, सरलाताई पाटील, सुलोचना नायकवडी, तौफीक मुल्लाणी, विशाल देवकुळे, सुनिल देसाई आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.