ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा

ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा

कागल प्रतिनिधी: जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत अग्निशमन व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून प्राप्त अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते येथे पार पडला आहे.

कागल शहरातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने या वाहनाचा मोठा लाभ होणार आहे.

कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, नवल बोते, के.पी.पिष्टे, अस्लम मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी, विवेक लोटे, सुधाकर सोनुले, अर्जुन नाईक, नवाज मुश्रीफ, अमित पिष्टे, सतीश पोवार, बच्चन कांबळे यांच्यासह इतर मान्यवर व कागल नगरपरिषदचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.