रस्त्याकडेलाच झाली त्याची निर्दयपणे कत्तल( मुंडके तसेच हातपाय छाटून उपकार कर्त्यालाच संपवले )
रस्त्याकडेलाच झाली त्याची निर्दयपणे कत्तल( मुंडके तसेच हातपाय छाटून उपकार कर्त्यालाच संपवले )
उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात
मी एक झाड बोलतोय. मी तेच वडाचे झाड बोलतोय ज्या झाडाला वटपौर्णिमा दोरी चे वेडे घालून मला बंधनात टाकले जाते.मी तोच वड बोलतोय ज्याला पुजून महिला जन्मो जन्मी मला हाच नवरा मिळवा यासाठी प्राथना करत असतात.मी तोच वड बोलतोय ज्याच्या पारंब्यावर झोकाले घेतले होते कितेक जणांनी आपले लहानपण माझ्या कुशीत आनंदात घालवले होते.मी तोच आहे ज्याने उन वारा, पाऊस यापासून कित्येक वर्ष वाहनधारक यांचे संरक्षण केले. अनेकांना कित्येक वर्ष जीवनावश्यक असणारा प्राणवायू दिला.परंतु,वाढत्या लोकसंख्येबरोबर विकासाच्या भकास संकल्पना तयार करत असताना माझ्यासारख्या कित्येक जीवन आवश्यक असणाऱ्या झाडांची कत्तल करताना खरच कसं काय सृष्टीला आपण दिलेल्या परताव्याची जाणीव होत नाही?माझे हात तोडले,माझे पाय तोडले, माझे मुंडके छाटले तरी मी माझ्या या निर्दयी जगात सांगू कुणाला? खरंच मी कुठे चुकलो का? विनामोबदला या सृष्टीला अनेक सुविधा मी दिल्या.आज माझीच कत्तल काही थोडक्यात क्षणात करण्यात आली. खरंच माझं काही चुकलं का? खरंच या कलियुगात न्याय आणि नीतिमत्तेने वागणाऱ्याला खरच अशीच सजा मिळते का?एवढ्या दिवसाचे उपकार काही थोडक्यात क्षणात ही मानव जात विसरून गेली का? खरंच एक दिवस याचा प्रकोप होईल आणि जशी मानव जात माझ्या अस्तित्वाची खेळली तसेच ही सृष्टी एक दिवस तुमच्या आयुष्याशी खेळेल..मी एक झाड बोलतोय...