HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर कारवाईची तयारी; तीन मोठे पर्याय चर्चेत

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर कारवाईची तयारी; तीन मोठे पर्याय चर्चेत

दिल्ली : पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आता केंद्र सरकारच्या संभाव्य कारवाईकडे लागले आहे. २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकप्रमाणे यावेळीही काही मोठी कृती होणार, असे संकेत मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना "कल्पनेपलीकडची शिक्षा" दिली जाईल, असा इशारा दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार पुढील तीन प्रमुख पर्यायांवर विचार करू शकते:

  1. पाकिस्तानचे तुकडे करणे
    बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करून, १९७१ च्या धर्तीवर मोठा धक्का देण्याचा विचार केला जाऊ शकतो. बलुच लिबरेशन आर्मीचा पाठिंबाही भारताला मिळू शकतो.

  2. हाफिज सईदच्या लपण्याच्या ठिकाणावर थेट हल्ला
    गुप्तचर माहितीप्रमाणे, हाफिज सईद पाकिस्तानातील मुरीदके येथे लपला आहे. त्याच्या ठिकाणावर थेट सैनिकी हल्ला करून दहशतवाद्यांचे मनोबल खचवले जाऊ शकते.

  3. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले
    बहावलपूरमध्ये जैशचे सक्रिय तळ नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्रांद्वारे कारवाई केली जाऊ शकते.

तसेच काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकव्याप्त काश्मीर (POK) सात दिवसांत पुन्हा ताब्यात घेण्याची क्षमता भारतीय लष्कराकडे आहे, मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर संसाधने आणि धोका स्वीकारावा लागेल.

फक्त लष्करच नव्हे, तर भारतीय नौदलाद्वारेही पाकिस्तानवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. कारगिल युद्धात नौदलाने पुरवठा रोखून पाकिस्तानला धक्का दिला होता. अशाच प्रकारच्या रणनीतीचा वापर या वेळीही होऊ शकतो.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.