India-Pakistan Indus Treaty: भारताने पाकिस्तानसोबतचा 'सिंधु जल करार' केला रद्द.. काय आहे हा करार?..जाणून घ्या एका क्लीकवर

नवी दिल्ली: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक निर्णायक पाऊल उचलले आहे. भारताने सिंधू जल करार रद्द करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, आता हा करार पुढे चालणार नाही. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या कराराच्या पुनरावलोकनाची सूचना दिली होती, मात्र आता अधिकृतपणे करार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काय आहे सिंधू जल करार?
१९६० मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती अयुब खान यांनी सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, भारताला तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी मिळते. रावी, बियास आणि सतलज-तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांचे पाणी मिळते, चिनाब, झेलम आणि सिंधू. भारत आणि पाकिस्तान हे पाणी जलविद्युत आणि सिंचन यासारख्या घरगुती कारणांसाठी वापरू शकतात. करारानुसार, भारत विविध कारणांसाठी पश्चिमेकडील नद्यांवर ३.६ दशलक्ष एकर फूट पाणी साठवू शकतो.
पाकिस्तानकडून संताप, युद्धाची धमकी
या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे. “पाण्याचे युद्ध” सुरू होईल, अशी धमकी पाकिस्तानकडून वारंवार दिली जात आहे. सिंधू जल करारात नमूद असलेले वाद निवारणाचे मार्ग पाकिस्तानने अनेकदा मोडले असून, स्वतःची बाजू कमजोर करून घेतली आहे, असा भारताचा दावा आहे.
भारताचे स्पष्टीकरण
भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सातत्यपूर्ण उल्लंघनांमुळे आणि वाढत्या लोकसंख्या, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आता हा करार चालू ठेवणे शक्य नाही. विशेषतः पहलगाम हल्ल्यासारख्या घटनेनंतर, दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या देशाशी करार टिकवणे शक्य नाही, हेही भारताने अधोरेखित केले आहे.