HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

विद्यार्थिनीने केला 'एसीपी'वर अत्याचाराचा आरोप ; कानपुर येथील घटना

विद्यार्थिनीने केला 'एसीपी'वर अत्याचाराचा आरोप ; कानपुर येथील घटना

उत्तर प्रदेश : आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी करणाऱ्या  एका विद्यार्थीनीने थेट सहायक पोलिस आयुक्तावरच बलात्काराचा आरोप केलाय.पीएचडी करत असताना  तिची ओळख ही सहायक पोलिस आयुक्त मोहसीन खान याच्यासोबत झाली. यादरम्यान मोहसीन खान याने विद्यार्थिनीला तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून जवळीकता वाढवली. अनेक महिने तिच्यावर बलात्कार केला. मात्र, विद्यार्थिनीला समजले की मोहसीन खानचे लग्न झाले असून त्याचा एक मुलगा देखील आहे. याबद्दल विद्यार्थिनीला कळताच मोहसीन खानने घटस्फोटाची केस सुरू असल्याचे तिला सांगितले.

विद्यार्थिनीचे म्हणणे आज न्यायालयात नोंदवले जाणार 

विद्यार्थिनीकडून एसीपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. विद्यार्थिनीचे म्हणणे आज न्यायालयात नोंदवले जाणार आहे. याप्रकरणी आरोपी एसीपी मोहसीन खान यांनी सांगितले की, ती विद्यार्थिनी खोटे बोलत आहे. ती मानसिक आजारी आहे आणि तिच्यावर उपचारही सुरू आहेत. विभागीय परवानगी घेऊन आपण पीएचडी करत होतो, असेही मोहसीन खानने म्हटले आणि तपासात सहकार्य करणार असल्याचेही सांगितले.

मोहसीन खान 2015 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्याच्याकडे एसीपी क्राइमचा पदभारही होता. जुलै 2024 मध्ये त्यांनी विभागीय परवानगीने सायबर क्राइम, इन्व्हेस्टिगेशन आणि क्रिमिनोलॉजी या विषयावर पीएचडी सुरू केली. विद्यार्थिनीने याबाबत तिच्या शिक्षक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आयआयटी कानपूरच्या व्यवस्थापनाच्या हस्तक्षेपानंतर पोलिस अधिकारी आयआयटी कॅम्पसमध्ये पोहोचले आणि तिचे बयान नोंदवून घेतले.

 घटनेने मोठी खळबळ 

या संपूर्ण प्रकरणावर डीसीपी अंकित शर्मा यांनी सांगितले की, आरोपी एसीपी जुलैपासून आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी करतोय. तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून एक महिला अधिकारी प्रमुख आहे. सर्व चाैकशी केली जाणार आहे आणि मग कारवाई केली जाईल. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. या प्रकरणी काही मोठे खुलासे देखील केले  जाऊ शकतात. मोहसीन खानवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.