HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'तिला' फेसबुकवरचं प्रेम पडलं महागात ; वारंवार अत्याचार अन् लग्न, सिगारेटचे चटके, हृदय पिऴवटून टाकणारी कहाणी

'तिला' फेसबुकवरचं प्रेम पडलं महागात ; वारंवार अत्याचार अन्  लग्न, सिगारेटचे चटके, हृदय पिऴवटून टाकणारी कहाणी

उल्हासनगर : फेसबुकवर सुरु झालेली प्रेम कहाणी तीला भलतीच महागात पडली. २७ वर्षीय पीडित तरुणीवर  ३८ वर्षीय आरोपीने प्रेमाचं नाटक करत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करत विवाह करण्यास भाग पाडलं. मात्र, त्यानंतरही आरोपी पीडितेला शाररिक आणि मानसिक त्रास देऊ लागला. इतकंच नाही तर त्याने पीडितेला सिगारेट आणि गरम तव्याचे चटके देत, तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार २७ वर्षीय पीडित तरुणी उल्हासनगर शहरात कुटूंबासह राहत होती. तिची ओळख उल्हासनगर शहरात राहणारा ३८ वर्षीय सुनील हिरानंदानी याच्याशी फेसबुकवर झाली. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून दोघांमध्ये मैत्री होऊन २०२१ मध्ये त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.  

त्यानंतर आरोपीने पीडितेला बहाण्याने लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे त्याने अत्याचार करतानाचा व्हिडिओही मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता. हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

 मध्यप्रदेशात नेले , खोलीत बंद केले अन्....

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला विवाह करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या आईने मध्य प्रदेश राज्यातील ग्वालियर येथे तिला नेले. याठिकाणी तिला एका खोलीत बंद करत तिचे केस कापले आणि पीडितेला सिगारेटचे चटके दिले. तर आरोपीच्या आईने गरम तवा मारून तिला गंभीर जखमी केले. दुसरीकडे, आरोपी तरुणाने पीडितेच आधारकार्ड पॅनकार्डच्या साह्याय्याने या कागदपत्रांचा दुरुपयोग करत धमकी दिली की, तुझ्या आई वडिलांकडून पैसे नाही आणले तर तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल. आरोपी वारंवार धमकी देत असल्याने अखेर पीडित तरुणीने धाडस करत तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचं कथन केले. त्या आधारावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.