HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

‘फेम च्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड ; खजानीसपदी कौस्तुभ नाबर तर कार्यकारिणी सदस्यपदी सुनील बासराणी

‘फेम च्या नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड ; खजानीसपदी कौस्तुभ नाबर तर कार्यकारिणी सदस्यपदी सुनील बासराणी

पुणे - महाराष्ट्रातील ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजची राज्यस्तरीय शिखर संस्था असलेल्या फेम (फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स) ची जनरल बॉडी मिटिंग पुणे येथे संपन्न झाली. यावेळी 'फेम' च्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. फेमचे संस्थापक अध्यक्ष अमरदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष मोतीराम पिंगळे व मावळते अध्यक्ष महेश कराडकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सन २०२५ - २७ या कालावधीसाठी अध्यक्षपदी  रवी पवार (नाशिक), उपाध्यक्ष प्रकाशभाई शहा (पुणे), सचिव रामदेव व्यास (छत्रपती संभाजीनगर), सहसचिव अजिंक्य उजळंबकर (छत्रपती संभाजीनगर), खजानीस कौस्तुभ नाबर, (कोल्हापूर) तसेच पुढील २०२७ - २९ या कालावधीसाठी अध्यक्ष (इलेक्ट) म्हणून संदीप झवेरी (सोलापूर) यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली. 

 

कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय साताळकर (पुणे), सुनील बासरानी (कोल्हापूर), दीपक जगताप (नाशिक), संतोष उदगिरी (सावा), राहुल देशपांडे (सातारा), नरेंद्र चौधरी (जळगाव), अरुण मलिक (छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र म्याना (अहिल्यानगर), सुनील बुधवानी (नागपूर), राजेश वाळवेकर (बेळगाव), परेश पेडणेकर (कोकण) यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला मावळते अध्यक्ष महेश कराडकर यांनी त्यांचा कार्य अहवाल मांडला. कौस्तुभ नाबर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व आर्थिक अहवाल सादर केला त्याला मंजुरी देण्यात आली.

नूतन अध्यक्ष रवी पवार यांनी जाहिरात एजन्सीच्या उन्नतीसाठी येणाऱ्या काळात विविध सेमिनार तसेच प्रशिक्षण शिबिरे  घेण्यात  येणार असल्याचे सांगितले. तसेच अद्याप ज्या जिल्ह्यांमध्ये जाहिरात एजन्सिजच्या जिल्हा संघटना कार्यरत नाहीत तेथे जिल्हा संघटना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे पवार म्हणाले. जाहिरात एजन्सी समोरील विविध समस्या व आव्हानांची यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. संदीप झवेरी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रामदेव व्यास यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मानले.

यावेळी पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, कोकण, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आदी जिल्ह्यांतील जाहिरात एजन्सिजचे प्रतिनिधी तसेच जिल्हा संघटनेचे सदस्य, राज्यातील सर्व एजन्सीजचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.