इंद्रायणी नदीवरील मावळमधील कुंडमळा मधील येथील पूल कोसळला

इंद्रायणी नदीवरील मावळमधील कुंडमळा मधील येथील पूल कोसळला

पुणे -  कुंडमळा (ता. मावळ) येथील इंद्रायणी नदीवरील जुना पूल काल दुपारी अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कुंडमळा या ठिकाणी पर्यटनासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. 

दुपारी साडेतीनच्या सुमारास पूल अचानक कोसळल्याने पूलावर असणारे अनेक पर्यटक आणि काही लहान मुले थेट नदीत पडले आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले असल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. घटनास्थळी पिंपरी - चिंचवड पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन दाखल झाले आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या घटनेत 32 लोक जखमी झाले असून त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.